Share Market Information In Marathi

Share Market Information In Marathi: जसे तुम्हाला जर प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला लाखों रुपयाची गरज असते तसे स्टॉक मार्केट मध्ये तुम्ही 5000 रुपयांपासून सुद्धा करू शकतात. त्यासाठी तुम्हाला एक डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करावे लागेल.

जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहे तर ते शेअर्स डिमॅट अकाउंट मध्ये ठेवले जातात, आणि ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला एका ब्रोकर कडून बनवून घ्यायचे आहे ज्यामध्ये तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतात.

Share Market Information In Marathi

शेअर मार्केट म्हणजे काय?

एखाद्या कंपनीचा कही भाग किंवा हिस्सा म्हणजे शेअर. समजा एखाद्या कंपनीकडे १०० शेअर्स आहे आणि तुम्ही त्यामधले १० शेअर्स विकत घेतले तर तुम्ही त्या कंपनीचे १०% हिस्सेदार होतात. आणि मार्केट म्हणजे या शेअर्स ची खरेदी विक्री जिथे होते.

शेअर मार्केट हि एक अशी जागा आहे जिथे कंपनीच्या शेअर्स ची खरेदी किंवा विक्री होते. आणि हि प्रक्रिया हि स्टॉक एक्सचेंज जसे BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि NSE (नेशनल स्टॉक एक्सचेंज) यांच्या मार्फत केली जाते. आणि या सर्व एक्सचेंज वर SEBI (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) नियंत्रण ठेवते.


शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी

1. IPO (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग)

जेंव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा त्यांचे शेअर्स सार्वजनिक करते तेव्हा त्याला IOP असे म्हणतात. IPO म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग. IPO हि कंपनीच्या शेअर्स ची पहिली सार्वजनिक विक्री असते, IPO खरेदी करणाऱ्या व्यक्तींना कंपनीमध्ये हिस्सा मिळतो.

कंपनीचा IPO येण्यामागचे वेगवेगळे कारण असू शकतात जसे त्यांना कंपनीच्या विकासासाठी भांडवलाची गरज असेल, नव्या कंपन्यांना विकास करण्यासाठी, काही कंपन्या आपल्या व्यवसायाचा खर्च भरण्यासाठी पण IPO आणू शकतात.

IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची – IPO हा काही मर्यादित काळासाठीच आणला जातो म्हणजे 3 दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत. जेव्हा तुम्ही आपो खरेदी करता तेव्हा तुम्ही डायरेक्ट कंपनीकडून शेअर्स खरेदी करता याला प्रायमरी मार्केट म्हणतात. IPO आणल्यानंतर कंपनी स्टॉक मार्केट वर रजिस्टर होते, स्टॉक मार्केट सेकंडरी मार्केट असते.

2. म्युच्युअल फंड गुंतवणूक

म्युच्युअल फंड मध्ये अनेक गुंतवणूकदार असतात. आणि यांच्या पैश्यांना गुंतवणूक करण्याचे काम फंड मॅनेजर करतात. आणि हि रक्कम शेअर बाजार, बॉण्ड, सोने, इत्यादी मध्ये लावली जाते. या फंड मॅनेजर ची शेअर बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार यांचा चांगला अभ्यास असतो. आणि या फंड मॅनेजर चा उद्देश गुंतवलेली रक्कम कमीत कमी रिस्क मध्ये चांगले रिटर्न देणे असतो.

म्युच्युअल फंड दोन प्रकारचे असतात एक ओपन एन्ड आणि दुसरा क्लोज एन्ड ओपन एन्ड म्हणजे तुम्ही कधीपण यामध्ये रक्कम गुंतवू आणि काढू शकता, आणि क्लोज एन्ड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ मर्यादा असते आणि या मध्ये ठराविक काळानंतरच रक्कम काढली जाऊ शकते.

3. बॉण्ड

बॉण्ड हा गुंतवणुकीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला FD पेक्षा जास्त रिटर्न मिळतो आणि यामध्ये रिस्क हा स्टॉक पेक्षा कमी असतो. जर एखाद्या कंपनीला पैशाची गरज असते तेव्हा ते निधी जमा करत असतात. फंड जमा करण्याचे तीन प्रकार असतात यामध्ये पहिला म्हणजे स्टॉक मार्केट मधून डायरेक्ट फंड उचलतात, दुसरा प्रकार म्हणजे ते बँकेकडून लोन घेतात आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये ते बॉण्ड इशू करतात.

Introduction to Share Market in Marathi


People also ask

शेअर मार्केट पैसे गुंतवणे सुरक्षित आहे का?

शेअर मार्केट हा पैसे गुंतवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामध्ये जर तुम्ही अभ्यास करून गुंतवणूक केली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल त्यासोबत शेअर मार्केट मध्ये जेवढा नफा आहे तेवढी जोखींम पण असते त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा.

गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे कसे कमवतात?

गुंतवणूकदरांनी गुंतवलेल्या पैश्यांवर त्यांना नफा मिळतो किंवा बऱ्याचवेळेस कंपनीला झालेल्या नफ्यातील काही भाग हा डिवीडेंट स्वरूपात गुंतवणूकदारांना मिळतो त्यातून ते पैसे कमावतात.


Leave a comment